मोकळा श्वास .......!
Monday, 5 February 2018
Saturday, 3 February 2018
गॅझेट आणि मुले

सध्याच्या काळात दूरदर्शन नाही असे घर सापडणे अवघडच. टीव्हीचे जसे
फायदे तसे तोटेही आहेत. विशेष करून लहान मुलांवर याचा जास्त परिणाम होतो.अगदी 2 वर्षाचे बाळ सुदधा सगळे काही समजत असल्यासारखे टीव्ही पाहतो.चित्रआणि आवाजामुळे तो पटकन त्याची नक्कल करतो. मागे एकदा छोटा भीममालिका चालू होती. छोटा भीम बघून मुलांना वाटायचे की लाडू खालला कीसगळ्यांना हारवता येते, खूप शक्ति येते, किती उडया मारले तरी लागत नाही .मोबाइल तर मुलांचे एक खेळणेच होऊन बसले आहे. किती सहजासहजी तेअप्प्स बदलतात, डाउनलोड करतात, प्ले गेम मध्ये जातात इत्यादी हे सर्व बघुन
खूप नवल वाटते, जसे काही त्याला पूर्ण वाचता येतय !!!
बाळाला गिफ्ट म्हणून एखादी रिमोट कंट्रोल ची गाडी दिली तर ताबडतोब पेपरफाडून वगैरे गाडी बाहेर निघते. रिमोटने गाडी चालवण्यात तो गुंग होऊन जातो आणि गाडी चालत नसेल तर तो उकलून पाहतो. टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप,कम्प्युटर, गाडी तसेच इतर कोणतेही ईलोक्ट्रोनिक उपकरण असो, मुले त्यातपुर्णपणे रमून जातात .त्याला न खाण्याचे भान असते न झोपण्याचे ,,,,पालकांनी याची चिंता करणे जरूरी आहे,वास्तविक पाहता आपण इथेच खूपमोठी चूक करतो. त्याचे नको इतके कौतुक केल्या जाते .लाड करण्याच्या नादात वय विसरून जाऊन त्याने जे मागितले ते आपण देऊन टाकतो. मुलांना एका मर्यादे पर्यन्त ही साहित्य दिली पाहिजेत .
आजकालची मुले त्यांना खेळण्यास काही देत नाही तोपर्यंत जवळ सुध्धा येतनाहीत. चॉकलेट, कॅडबरी पेक्षाही मोबाइल जास्त प्रिय असतो. कितीच्या किती वेळते रमून जातात .
जसे जसे ते वापरत जातात तसतसे त्यांची क्षमता वाढण्यास मदत होते.
वेगवेगळी स्किल वापरू शकतो. बुध्दिमत्तेत वाढ होते . त्याच्या व्यक्तिमत्वातफरक पडतो.पाठांतर लवकर होते. इतरांचे संभाषण ऐकून ऐकून बाळाची भाषा सुधारते,सगळ्या सारखे तो कपडे मागतो.एकूणच प्रगति जास्त !!!!मुलांच्या ईलोक्ट्रानिक वापरावर आपणच बंधने घातली तर काही नुकसान नाही पण आई , वडील सतत कोणत्या न कोणत्या स्क्रीन वर बिझी असतील तर त्याचेअनुकरण मुले करतात , व्हाट्सअप,फेसबुक या आणि इतर माध्यमाचा उपयोग लहान मुलेही अगदी सर्रास करतात,म्हणूच बाळ काय करतय ,काय खेळ्तय तसेचकोणाबरोबर च्याटिंग करतो यावर घरातील मोठ्यांनी लक्षं ठेवले तर मुलांच्या प्रगतीत वाढ होते.
शिवांगी कुलकर्णी
औरंगाबाद
मोबाइल माझा गुरू
एकविसाव्या शतकातील अख्खी पिढी ही टेक्नोलॉजिला अॅडीक्ट आहे. ही पिढी स्वत: ला गॅझेटमध्ये रमवून घेते. यात गेम्स, शैक्षणिक अॅप्स, म्युझिक आणि बरेच काहींचा समावेश आहे.
आजच्या आर्इ (मम्मी) गरोदरपणी मुलांची घ्यायची काळजी, वजन कसे वाढवावे, काय खावे, काय प्यावे, किती वाजता झोपावे, कोणते व्यायाम करावे आदीं गोष्टींसाठी वेगवेगळ्या अॅप्सवर अवलंबून असतात.
मुलं जन्माला आल्यावर मुलांची वाढ कशी करावी, त्यांना काय खायला द्यावे, त्यांच्या आजारपणात काय काळजी घ्यावी अश्या अनेक गोष्टींची माहिती अॅप्स घेतात. त्यामुळे पुढे ही मुलं थोडी मोठी झाली की, आर्इ- बाबांचा मोबाइल घेऊन लॉक उघडून वेग-वेगळी गेम्स खेळतात कारण घरात आर्इ- बाबा नोकरी करतात. तार्इ- दादा शाळेत जातात. आजी-अजोबा वृध्दाश्रमात असल्यामुळे या लहान मुलांचा मोबाइल हाच गुरू झाला आहे.
लहान अवघ्या आठ महिन्याचे मुलं हे मोबाइल बालगीते पाहिल्याशिवाय जेवण करत नाही. तर काही मुलं बाहेर गेल्यावर आर्इ- बाबांना त्रास देतात म्हणून हा घे फोन आणि शांत बस असा सल्ला पालकच देतात. यात या मुलांची काही चुक नाही किंवा पालकांची सुध्दा काहींची नाही. हा बदल आहे तो येणा-या परिस्थितीचा. परंतू याकडे आपण सकारत्मकपणे पाहिले पाहिजे.
अवघी दोन वर्षांची मुलं या अॅप्समुळे प्राणी, पक्षी ओळखू लागले. रंग- आकार समजू लागले. मराठी- इंग्रजी बाराखडी,
अंक गणित ऐकून म्हणू लागले. हा बदल चांगला आहे. या मुलांना काही सांगण्याची गरज नाही. ते आपले आपणच शिकू लागले आहेत. ही चांगली बाब आहे. काही अॅप्स असे आहेत की त्यात श्लोक, आरत्या, गोष्टी अश्या ब-याच गोष्टी एकत्रित समावेश केला आहे. त्यामुळे मुलं आता श्लोक म्हणू लागली आहेत. तसेच ऑडिओ बुकमुळे मुलांना आता पुस्तक ऐकण्याची सवय लागली आहे.
त्यामुळे आपणच याकडे दृष्टीकोन बदलून पाहणे आवश्यक आहे. ही बद्दलाची नांदी आहे. आगामी काळातील डिजिटल एज्युकेशनचे पाऊल पडते पुढे. त्यामुळे मुलं आता डिजिटल होऊन शिक्षण घेतील.
प्रतिक्षा परिचारक - पाठक
औरंगाबाद
प्रतिक्षा परिचारक - पाठक
गॅझेट चा वेगळाच अर्थ.
पूर्वी रोजचा दिवस सुरु व्हायचा तो रेडियो किंवा वर्तमानपत्राने आणि संपत होता तो कुटुंबातल्या वेगवेगळ्या विषयांनी, पण आता रोजचा दिवस सुरू होतो इंटरनेटनं आणि संपतोही इंटरनेटनं ! इंटरनेटमुळे जग कसं जवळ आलंय ज्ञानाची गंगा उपलब्ध झाली आहे. पण आपल्यापैकी कितीजण या इंटरनेटच्या जाळ्यात अडकली आहेत हे पाहणंही फार गरजेचं झालंय. इंटरनेटच्या व्यसनामध्ये काही प्रकार आहेत ऑनलाइन गेम खेळणं, माहिती गोळा करत सुटणं, बाजारात येणारी नवनवी गॅजेट विकत घेत रहाणं आणि लहान मुलान मध्ये प्रत्येक गॅजेट आपल्याकडे असायलाच हवं, असा अट्टहास असणं,
इलेक्ट्रॉनि गॅझेट चा अर्थ लहानसहान कामासांठी उपयोगी पडणारे साधन यंत्र असा होतो. पण हि बातमी वाचताना गॅझेट चा नवीन वेगळाच अर्थ समजतो, बडोद्यातील एका तेरा वर्षांच्या मुलीने स्वत:चे महागड्या इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्सचे व्यसन पूर्ण करण्यासाठी चक्क वेश्याव्यवसायाचा मार्ग स्वीकारला. फार पूर्वीपासून महागडे मोबाईल, आयपॅड आणि लॅपटॉपचे आकर्षण होते. या मुलीची आई येथे एक बांगड्याचे दुकान चालविते. घरची कमाई फारच कमी असल्याने या मुलीला महागडे गॅझेट्स खरेदी करणे शक्य होत नव्हते. अखेर आपली हौस पूर्ण करण्यासाठी तिने वेश्याव्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. एका खासगी वापराच्या मोबाईलच्या माध्यमातून ही मुलगी विशिष्ट व्यक्तींशी संपर्क साधत आणि त्यांच्या माध्यमातून देहविक्रय करत असत. जेव्हा ती गर्भवती असल्याचे तिच्या आईला समजले तेव्हा हा सर्व प्रकार उघड झाला. हि बातमी मनाला चटका लाऊन गेली.
क्षणभर मी मागे गेले पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा या तीन माणसांच्या मुलभूत गरजा आहेत अस सागितलं जायचं, त्यात बदल होऊन मग आरोग्य, शिक्षण समाविष्ट झाले. आता तरुणांच्या (५ ते १५ वयोगट) बाबतीत गॅझेटसुद्धा जीवनावश्यक गोष्टच बनली आहे. लहान मुलांमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सची क्रेझ इतकी वाढत आहे की ते एकलकोंडे होत आहेत आता याच व्यसनापायी त्यांची पावले भलत्याच दिशेला पडताना दिसत आहेत. देशाच्या महागरांमधील 5 ते 12 या वयोगटातील 82 टक्के मुलांकडे मोबाईल, टॅबलेट आणि "आयपॅड‘, अशी "गॅझेट्स‘ आहेत. "गॅझेट‘च्या अतिवापरामुळे मुलांमध्ये सामाजिक विजनवास, नैराश्य, निद्रानाश, चिंता, जाडेपणा, मानसिक अनारोग्य, अशा समस्या निर्माण होत आहेत, असे "ऍसॉचॅम‘च्या अहवालातून समोर आले आहे.
जग झपाट्याने बदलतंय. त्यांना समजून घेण्यासाठी चौकटीच्या बाहेरचा विचार करण्याची गरज आहे. आपण त्यांच्या आजच्या काळातील गोष्टीत इंटरेस्ट दाखवला तर आनंदाने संवाद साधल्या जाईल. पैशाची किंमत त्यांना कळायला हवी त्यासाठी त्यांना विश्वासात घेऊन घरच्या आर्थिक परिस्थितीची माहिती द्यावी व त्यात त्यांना सहभागी करून घेतले तर, ते खूप हुशार आहेत त्यातून ते मार्गही सुचवतील. .सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना ऐकाल तर ते तुम्हाला ऐकतील व सगळ्या विषयांवर मोकळेपणाने संवाद साधता येईल.
सीमा लिंगायत कुलकर्णी
पुणे

Saturday, 27 January 2018
Thanks to whatsapp
सर्वात आधी मला असं मांडावस वाटतंय कि आपण बायकांनीना guilty फीलिंग सोडून द्यायला पाहिजे कारण आधीच बायकांविषीयी बोलायला प्रत्येकजन अगदी उस्तुकनेते (टोमणे मारायला ) तयार असतात त्यातही असे विषय दिले तर आपणच आपल्याला कमी लेखायला कमी करत नाही म्हणूनच मी आधी सांगते आपण काही जगावेगळे वागत नाही आहोत उलट जर आपण फक्त चूल आणि मूल करत बसलो तर आपल्यातील mulitasking skill अगदी वाया जाईल बरं का.
अगदी देवाने सुद्धा मान्य केलेले आहे आपण स्त्रिया सर्वगुणसंपन्न असतात आणि आपण बराच गोष्टी at a time handle करू शकतो मग ते स्वयंपाक करणे , मुलांना संभाळणे , त्यांचा अभ्यास करवून घेणे , नातेवाईकांना आणि फ्रेंड्स जपणे अगदी सहजपणे करू शकतो.
Thanks to whatsapp कारण जो पर्यंत whatsapp नव्हत तो पर्यंत जीवन अगदी रेंगाडल्यासारखं वाटत होत आता कसं जीवन हलकं फुलकं मनोरंजक झालंय, एक आहे कोणतीही गोष्टीचा अतिरेक झाला नाही तर त्यातून आनंदच होतो पण "अति तेथे माती " लक्ष्यात असू द्या मैत्रिणींनो. & Enjoy the Era of "चूल ,मूल आणि व्हाट्सअँप "

व्हॉटस् अॅप !
या वरच्या दोन फोटो मध्ये खूप साम्य आहे. फक्त काळानुरूप हातातल्या गोष्टी बदल्या आहेत. पण उजव्या बाजूच्या फोटोला चूल मुल आणि व्हॉटस् अॅप असे नाव देण्यात आले . आणि तो फोटो खूप व्हायरल झाला. आणि त्यावरून जोक, चर्चा पण खूप झाल्या. गंमतीचा भाग सोडला समाजमाध्यमांच्या गैरवापरावरून नेहमी टीका होते, मात्र त्याचा सुयोग्य वापर केल्याने घडून आलेल्या सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे.
प्रत्येक स्त्री हि सकाळी लवकर उठते. मुलांचा ,नवऱ्याचा डब्बा , घरातली बाहेरची कामे, पाहुणे मंडळींचे स्वागत, हे सगळं वेवस्थित पार पाडत असते. . त्यातून वेळ मिळाला कि व्हॉटस् अॅप बघते. पण या व्हॉटस् अॅप वर काही जोक , चांगले विचार, मित्र मैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या सुख दुःखात सहभागी, वेगवेगळ्या रेसिपीज , मुलांच्या शाळेचे मॅसेज, क्लास चे अपडेट हे सगळं तर आमच्या मोबाईल वरच येत असतात. त्यातून आमच्या कार्यक्रमाचे प्लॅनींग हे सगळं या व्हॉटस् अॅप मुळे सहज आणि सोपे झाले आहे.
हेच बघा ना! एकदा काय शाळा सोडली की विखुरलेले मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटणे अशक्य होत असे, पण हे एकेकाळचं चित्र आता बदलतंय. फेसबुक, व्हॉट्सअॅपमुळे जुन्या मित्र-मैत्रिणींना शोधून त्यांच्याशी पुन्हा जोडलं जाणं सोपं झालंय. व्हॉट्सअॅप ग्रुप्स होतात, पुढे शाळेच्या आठवणीने ‘गेट टुगेदर्स’ही केली जातात. त्यानिमित्ताने शाळेत जाणं आणि शाळेच्या दिवसांतल्या आठवणींना उजाळा देणं ही कधी कल्पनेतही नसलेली किमया याच ‘सोशल मीडिया’मुळे शक्य झालं आहे.
पण मैत्रिणींनो यात थोडी रिस्क पण आहे ती सांभाळून करूया एन्जॉय चूल मुलं आणि काय झालं ! अहो म्हणजे व्हॉटस् अॅप ! 😰😰
सीमा लिंगायत कुलकर्णी
पुणे
Saturday, 20 January 2018
आजीच्या मैत्रिणीला conference call
काल पिल्लु आजीच्या कुशीत बसून आजीचा मोबाइल
पाहत होती.
आजी नातीच्या गप्पा मी काम करतात ऐकत होते.
पिल्लु आजी म्हणाली, आजी तू खुप भारी आहेस.
आजी म्हणाली का गं बार्इ…???
अगं तू whats app, twitter,
facebook कसं वापरतेस
गं….
अगं तुझ्या आर्इ आणि आत्याने शिकवले मला.
आणि यात मराठीत सगळ्यांशी बोलता येते.
त्यामुळे काय सोप झालं मला.
ओहहह…. आजी तू व्हॅटस् अॅपवर कोणाशी बोलते आहेस…
किती छान आहे गं हे बाळ
अगं… कोण आहे गं
ही माझी बाल मैत्रिण आहे गं या व्हॅटस अॅपमुळे तब्बल
३० वर्षानंतर आम्ही परत बोलू लागलो. हे सांगताना आजीच्या डोळ्यातून आनंदाने अश्रू वाहू लागले.
त्यांचा हा संवाद ऐकत मी काम करता करता मध्ये थांबले आणि विचार करु लागले की, या टेक्नोलॉजीमुळे जग किती जवळ आलं आहे. हे आपण म्हणतो. परंतू माणसंसुध्दा नव्याने भेटली आहेत. किती छान कल्पना आहे की, ऐखाद्या व्यक्तीला आपण ३० वर्षानंतर नव्याने भेटतो. अन माझ्या चेहर्यावर स्मीत हस्य उमटले.
या टेक्नोसॅव्हीचा सुखद अनुभव घेऊन मी माझ्या दिवसाच्या कामाला सुरूवात केली.
आणि काही दिवसापूर्वी सगळ्या इंटरनेट कंपन्यांनी एक दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवली होती. त्यांची कारणं काही वेगळी आहेत. त्या कारणांत काही मला पडायचे नाही. आजी नातीचे काय करावे सुरु होते.
पिल्लू youtub वर बालगीते पहायची होती तर आजी एका महत्त्वाच्या मॅसेजची वाट पाहत होती. कारण आज गेटटुगेदरच्या प्लॅनिंगवर चर्चा करायची होती. काय करावे काही सुचेना आजी. मग काय आजीने अन् नातीने केले आजीच्या मैत्रिणीला conference call अन आजीचा जीव पडला भांड्यात. त्यामुळे मुळातच मोबाइलचा वापर आणि अतिरेक यापेक्षा आपण याकडे चांगल्या उद्देशाने पाहिले तर आपला हेतू सफल होतो.
प्रतिक्षा पाठक
औरंगाबाद
आजी झाली टेक्नोसॅव्ही
विज्ञानाच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत आहेत. नवनीन
तंत्रज्ञान विकसित होत आहे. यामुळे आपली प्रगतीच आहे. आजची पिढी तर आहे पण आपले आजी
,आजोबा किंवा आई वडील असो आपल्यापेक्षा ते अधिक टेक्नोसॅव्ही आहे.
हेच, बघा ना माझे वडील ऑफिसच्या काम निमित्त लवकर टेक्नोसॅव्ही
झाले. पण आईचे तसे नव्हते झाले. आमच्या भोवतालीच
संपूर्ण दिवस जात होता. स्वतःसाठी वेळ कधी देता आलंच नाही.
मग आम्ही सगळ्यांनी मिळून तिला मोबाईल गिफ्ट दिला 😍. आणि ठरवले तिला पण आपल्या सारखे टेक्नोसॅव्ही करायचे
. आधी आम्हाला थोडे अवघड झाले. पण आता गाडी सुसाट धावते 😍 .
सकाळी उठल्या
पासून मॅसेज, काही फोटो, काही सुंदर विचार , असं सगळं पाठवत असते आणि ते सगळं वाचण्याचा अट्टाहास असतो 😂. आणि ऑन लाइन खरेदी
पण 😂, आता तर घरात लहान नातू आहे. त्याचे फोटो काढणे , व्हिडीओ तयार करणे आणि मैत्रिणींना
ग्रुप वर पाठवणे, आणि आम्हाला हसत म्हणते 😂, बघा नातवाच्या फोटोला फेसबुक वर किती लाइक आणि कंमेंट
आल्या😜, आणि बरका त्या सगळ्या माझ्या मैत्रिणींनीच आहेत 😜.
व्हाट्स अप
वर इतके वेगवेगळे ग्रुप असतात. आणि संपूर्ण महिन्याचे कार्यक्रम ठरलेले असतात. पण व्हॉटस
अप आणि फेसबुक यांनी जुन्या मैत्रिणींना एकत्र आणले आणि नव्याने काही मैत्रिणीशी ओळख
झाली. यामुळे हितचिंतकांनी आशीर्वाद, शुभेच्छा देणे हे साध्य झाले. आणि स्वतःसाठी
वेळ देणे शक्य झाले. हे बघून आम्हाला खूप समाधान
मिळते 😵😵.
यातून एक
गोष्ट अशी लक्षात येते कि, नव्या तंत्रज्ञानामुळेच जग अधिक जवळ आले
हे खरे आहे. टेक्नोसॅव्ही जगात
आपणही तंत्रात मागे न राहता त्याचा उपयोग करावा, या हेतूने तर नवनवीन उपकरणांची
माहिती ते घेत आहेत. त्यांना आता नवे ते हवे आहे 😊.
सीमा लिंगायत कुलकर्णी
पुणेSunday, 14 January 2018
परत लहान होऊ या !
आईबाबा होणे हा निसर्गाने दिलेला सन्मान आहे 👪. घरात लहान मुल असले की आपणही लहान होतो 👶.
त्याचं खेळणं, रुसणं,फुगणे, आनंदाने बागडणे यातच संपूर्ण दिवस कसा जातो ते कळतच नाही. दिवस भराभर निघून जातात आणि मुले मोठी होतात.
परवा मी कपाट आवरत असताना जुना फोटोचा अलबम मिळाला. त्यात सगळे सक्षमचे👶 म्हणजे माझ्या मुलाचे फोटो होते लहानपणीचे . तो पण माझ्या बाजूला बसून फोटो बघत होता. फोटोकडे बघून हसत होता 😂 काही आठवणी सांगत होता. त्यात त्याला त्याचा सॉक्स घालतानाच फोटो दिसला. तेव्हा मला खुप हसू आले 😂 . त्याला राग आला 😞 , तो मनातला एवढ्या छान फोटोकडे बघुन तू का हसतेस.
हा फोटो बघत असताना तुझी खोडी आठवते.तु ३ वर्षाचा असताना मी आंघोळीला गेल्यावर तू बाथरूमची बाहेरून कडी लावून घेतली होती😢. मी तुला खूप आवाज दिले ,आपल्या खालच्या काकू येऊन बेल वाजवत होत्या तरी तू दरवाजा उघडत नव्हता😢 .मग मीच कसा तरी जोरजोरात दरवाजा हलवला आणि कडी आपोआप निघाली . आणि बाहेर आल्यावर बघते तर तू सॉक्स घालत होतास 😂 😂 😂 आणि मी लगेच हा फोटो काढला .
मग काकू मी खूप हसत होतो😅😅😅. आणि आम्ही पण आमच्या बालपणातल्या खोड्या, गमती, जमती सागंण्यात रमुन गेलो. आणि माझ्या मुलासोबत आम्ही पण परत लहान झालो .😍😍😍😍😍😍

Subscribe to:
Posts (Atom)