मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Saturday, 13 January 2018

हॅलो फ्रेंड्स

मी सुरुवात करत आहे "माझे पान" या नावाने , तसे बघायला गेले तर आपल्या मनात भरपूर काही दडलेले असते. कसे बोलावे , कधी बोलावे या विचारताच आपले विचार हरवून जातात.मला माझ्या एका मैत्रिणीने या ब्लॉग बद्दल सांगितले, मग विचार केला यावरच आपले विचार व्यक्त करावे.तसे बघायला गेले तर दिवस असे पटापट जातात कि काही समजायच्या आताच आपली मुले लगेच मोठी होऊन जातात आणि मधेच केव्हातरी जुने फोटोज बघता बघता लक्षात येतात बऱ्याच मस्ती मजा आणि खोडी आपल्या पिटुकल्यांच्या .माझा मुलगा लहान असल्यापासून फारच मस्तीखोर, तासा आता बराच शांत आणि समजदार झाला आहे. मला आठवणीत राहिलेले दोन प्रसंग मी येथे वर्णन करत आहे१. ३ वर्षांचा असतांना एकदाना खाली खेळतांना  ३ पायऱ्या वरून उडी मारून पडला आणि जे रक्ताने भरला ना, मी नेमकी घरी होते म्हणून बर झालं.२. दोन वर्षा आधी बेट्याने हात सुध्दा फॅक्चर करून घेतलेला तेंव्हासुध्दा मीच आपली रडत होते त्याने अगदी समजदार मुलासारखे सगळे सहन केले.असो असे आमचे चिरंजीव उद्योग करत ह्या आठवणी आल्या कि आपोआप डोळे पाणावतात. पण आता बरेच मोठे झाले कि तेच कौतुकाने आपले पराक्रम आपणच सगळ्यांना सांगतात आणि हसवतात.खरं आहे "वेळच माणसाला शिकवते, सावरते आणि पुढे चालायला सांगते".

मुर्ती लहान पण कीर्ती महान



"अरे संसार संसार......"

💁मला दोन गोड मुली आहेत कनक आणि वर्निका😘. पहिली मुलगी कनक माझ्या जीवनात आली तर तिने मला, माझ्या जिवनाला एक नवीन दिशा दिली😄. आणि माझे आयुष्यच बदलले. तिचे आगमन खूप सुखद होते.ती माझ्या जिवाची प्राण होती.तिला मोठी करतांना माझी खूप धावपल झाली 😥. पण तिला बघितले की सर्व कसरीतीचे सार्थक झाल्या सारखे वाटायचे😍. दिवसाची रात्र कशी व्हायची ते समजलेच नाही.
तिचा पहिला शब्द "मा"  ऐकून माझा आनंद गगनात मावेना💃."आज मैं उपर आसमां नीचे....." 💃
ती माझ्याशिवाय आणि मी तिच्याशिवाय राहणे अशक्यच होते😳. अशीच आमची 3 वर्ष सरली.
आता मी एक मुल व्यवस्थित सांभालण्यात पारंगत झाले🤗...  होते. 
तर आमच्या आयुष्यात दुसरा टर्निग पाँइट आला.... तो म्हणजे माझी दुसरी राजकुमारी"वर्निका"😘.आता माझी खूशी पण डबल आणि कसरतही डबल झालेली😭 . दोघींना सांभालने म्हणजे तारेवरची कसरत🙆.  एक झोपली की दुसरीला जेवण , मग हिच जेवण होते तोपर्यंत झोपलेली उठते😭🤧. तशी आमच्याह्यांनी खूप मदत केली हे सर्व सांभालतांना 🤓म्हणून ठिक होते. पण ते ड्युटीवर असतांना खूप नाकेनौ यायचे😒. पण सरले ते दिवसही🤗.
आता छोटीही 3 वर्षाची झाली.पण तरीही दिवस कसा सरतो कलत नाही..😇. आता दोघी मस्त खेलतात आणि मस्त भांडतात💪. पण रडत आपल्याजवल आल्या की बाजू कोणाची घ्यावी ? हा मोठा प्र श्न 🤦
मोठीला अभ्यासाला बसवल की छोटी नेमकी तेव्हाच बडबड चालू करते,"मम्मी मुझेभी पढाओ ना.' मग हीच concentration गेले उडत🙄.असो आता मला सवय झाली ,मुल मोठी झाली की त्यांच्या नवीन समस्या समोर येतात💆.
मी देवाचे आभार मानते की त्यांनी मला इतक्या प्रेमल मुली दिल्यात 🙏. दोघी खूप जीव लावतात😘 आणि कधी कधी खूप जीवही घेतात🙄😥.म्हणून कधी कधी खूप प्रेम येते दोघींवर तर कधी कधी झोडून काढावे असे वाटते🙁.त्या दोघींमुले मला माझे बालपण परत एकदा अनुभवता आले.आणि माझ्या आईची खरी किंमत कलली.🙏love u Mumma😘& love u too my both Princess.😘😘..
यालाच म्हणतात ,"अरे संसार संसार......"💁
Thank u my dear friends for reading my part of life.😃