आपल्या आयुष्यात अन्न, वस्त्र,निवारा, इंटरनेट हा अविभाज्य घटक बनला आहे.अन् टेक्नोसॅव्हीचासुखदअनुभव घेऊन मी माझ्यादिवसाच्या कामाला सुरूवात केली. काही दिवसांपूर्वीइंटरनेट सेवा अचानकचबंद झाली. आजी नातेचे काय करावे सुरु होते.पिल्लू youtub वर बालगीते पहायची होती.तर आजी एकामहत्त्वाच्या मॅसेजची वाट पाहत होती.
काल पिल्लु आजीच्या कुशीत बसून आजीचा मोबाइल
पाहत होती.
आजी नातीच्या गप्पा मी काम करतात ऐकत होते.
पिल्लु आजी म्हणाली, आजी तू खुप भारी आहेस.
आजी म्हणाली का गं बार्इ…???
अगं तू whats app, twitter,
facebook कसं वापरतेस
गं….
अगं तुझ्या आर्इ आणि आत्याने शिकवले मला.
आणि यात मराठीत सगळ्यांशी बोलता येते.
त्यामुळे काय सोप झालं मला.
ओहहह…. आजी तू व्हॅटस् अॅपवर कोणाशी बोलते आहेस…
किती छान आहे गं हे बाळ
अगं… कोण आहे गं
ही माझी बाल मैत्रिण आहे गं या व्हॅटस अॅपमुळे तब्बल
३० वर्षानंतर आम्ही परत बोलू लागलो. हे सांगताना आजीच्या डोळ्यातून आनंदाने अश्रू वाहू लागले.
त्यांचा हा संवाद ऐकत मी काम करता करता मध्ये थांबले आणि विचार करु लागले की, या टेक्नोलॉजीमुळे जग किती जवळ आलं आहे. हे आपण म्हणतो. परंतू माणसंसुध्दा नव्याने भेटली आहेत. किती छान कल्पना आहे की, ऐखाद्या व्यक्तीला आपण ३० वर्षानंतर नव्याने भेटतो. अन माझ्या चेहर्यावर स्मीत हस्य उमटले.
या टेक्नोसॅव्हीचा सुखद अनुभव घेऊन मी माझ्या दिवसाच्या कामाला सुरूवात केली.
आणि काही दिवसापूर्वी सगळ्या इंटरनेट कंपन्यांनी एक दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवली होती. त्यांची कारणं काही वेगळी आहेत. त्या कारणांत काही मला पडायचे नाही. आजी नातीचे काय करावे सुरु होते.
पिल्लू youtub वर बालगीते पहायची होती तर आजी एका महत्त्वाच्या मॅसेजची वाट पाहत होती. कारण आज गेटटुगेदरच्या प्लॅनिंगवर चर्चा करायची होती. काय करावे काही सुचेना आजी. मग काय आजीने अन् नातीने केले आजीच्या मैत्रिणीला conference call अन आजीचा जीव पडला भांड्यात. त्यामुळे मुळातच मोबाइलचा वापर आणि अतिरेक यापेक्षा आपण याकडे चांगल्या उद्देशाने पाहिले तर आपला हेतू सफल होतो.
प्रतिक्षा पाठक
औरंगाबाद
3 comments:
chhan
Thank You.
khary.
Post a Comment