‘बेळगाव निवासी प.पु कलावती देवी यांचा जन्म ऋषीपंचमीच्या दिवशी कारवार येथे झाला .त्यांचे बालपण अतिशय सात्विक व धार्मिक वातावरणात गोकर्ण येथे गेले. त्याकानडी इयत्ता ४ थी शिकल्या होत्या. त्यांचा विवाह वयाच्या १७ व्य वर्षी झाला १९ व्यावर्षी वैधव्य आले. अवघ्या चार वर्षाचा संसार पण तो हि अगदी छान . त्या म्हणायच्या ज्याला ज्याला संसार चांगला करता आला तो परमार्थात कधीच कमी पडत नाही . पतीची सेवा म्हणजे गुरुसेवा होय . स्वतःच्या अल्पवयीन मुलांना आईकडे ठवून त्या गुरुप्राप्तीसाठी घराबाहेर पडल्या . त्यांचे गुरुहुबळीचे 'सिद्धारूढ महाराज' गुरुसेवा चांगली झाल्यामुळे लवकरच त्यांच्यावर गुरुकृपा झाली ।।ॐनमः शिवाय
।। हा गुरुमंत्र घेवून अज्ञानांचे अज्ञान दूर करण्यासाठी, हरिनाम
प्रचारासाठी त्यांनी देह झिजविला.
भक्त त्यांना 'आई' म्हणत. आई कायम म्हणायच्या आपले लक्ष देवाकडे
गेले कि देव आपल्या संकटी धावून येतोच. दिवसभरातून एक तास तरी देवाचे समरण करावे ,
त्याच्या सत्त्तेशिवाय काहीही
नाही त्या प्रापंचिकांनाही स्वछता, काटकसर कशी करावी
हेही सांगत . त्या म्हणायच्या एक पैसे शोधण्यासाठी चार पैस्याचे तेल वाया घालवू
नये. आवश्यक तेथे जरूर पैसे खर्च करावा. आईंनी प्रापंचीक व परमार्थीक
मार्गदर्शन पर स्वलिखित अल्पदरातप्रकाशन काढली.सतत नामघेतल्याने संकटाशी
झुंज देण्यास बळ मिळते परंतु नाम घेतांना पथ्य सांभाळावी जसे खोत बोलू नये.,
मनात कपट ठेऊ नये. दुसऱ्यांचे वाईट झाल्यास आनंद मानू नये व
देवावरपूर्ण विश्वास ठेवावा . तो जे करतो ते चांगल्यासाठीच हा विश्वास ठेवावा आई
सांगतात आपण आगगाडीने प्रवास करताना सामान डोक्यावर घेवून बसतो का?नाही ना! कारण आपल्या बरोबर आपले सामान येणारच , तसेच
प्रपंचाची काळजी करू नये. तो कर्ताकरवीत आहे. प्रश्न तो देतो तर उत्तरही तोच देतो.
आपण फक्त त्याचे सतत स्मरण ठेवावे.
प.पु आईंनी ८ फेब्रुवारी ७८ रोजी
आपला देह ठेवला . पण मनाने आजही आई आमच्या हाकेला धावून येतात त्यांच्या सारखे
गुरु आम्हाला लाभले हे आमचे पूर्व पुण्य अश्या स्त्री संत प. पू. कलावती देवी
(आईंना )माझे कोटी कोटीप्रणम्य कलयुगात हि भवनदी पार करण्यासाठी त्यांची
कृपादृष्टी सदैव आमच्यावर आहे म्हणूनच-
'मरतो तो गुरूंनाही,रडतो तो शिष्य नाही'
।। सद्गुरू सारिखा असता पाठीराखा.
इतरांचा लेख कोण करी ।।
माधवी शहाणे
औरंगाबाद
No comments:
Post a Comment