ऐका मनिषा मुळे यांनी valentine day वर केलेली व्हिडीओ क्लिप
मनिषा मुळे
औरंगाबाद
माझा नवरा मला चिडवण्यात एक नंबर आहे, |
मी त्याला सहज विचारले अहो तुम्हाला आपला पहिला valentine day आठवतोय का? |
तर मला म्हणतात तरी कसे " आता हा कुठला मराठी सण आहे ?" |
कपाळाला हातच मारून घेतला मी कि कुठून विचारले ह्यांना , |
तसे बघायला गेले तर खरंच आहे, हे आपला पहिल्या valentine day पेक्षा Anniversary लक्षात ठेऊ या ना मैत्रिणींनो. |
माझे लग्न ११ फेब्रुवारी ला झाले माझ्या पहिल्या valentine day ला माझ्या नवऱ्याने माझ्या समोर त्याच्या मनाचे पुस्तक उघडले आणि तेच माझे पहिले गिफ्ट आहे . |
आता तुम्ही विचारणार त्यांनी तुम्हाला काय सांगितले तर ऐका " त्यांनी मला सांगितले कि त्यांचे एका मुलीवर खूप मनापासून प्रेम होते " पण आज मी तुला हेचं सगळे सांगू इच्छितो कि कारन आजपासून मी सर्वस्वी तुझाच झालो आणि तुझाच राहणार " बस्स त्या दिवशी पासून आम्ही कधीही valentine day पेक्षा आमची Anniversary च साजरी करतो. |
माझ्या मते हेचं माझं valentine day च "बेस्ट गिफ्ट आहे" |
थांबा थांबा मैत्रिणींनो अजून एक गंमत सांगायची राहिली , तसा माझा नवरा आहेच मुळी हुशार, म्हणतो कसा मला ... |
"कुठं आहे मग आपले first anniversary गिफ्ट ? " |
आता लग्नाला १३ वर्ष झालीत माझ्या आणि काय आहे न मला वस्तू मी कुठे ठेवते हेच ना कधी कधी आठवतच नाही . |
मग मला माझ्या first anniversary ला मिळालेली घड्याळ कुठं ठेवली हेच आठवत नाही. |
आणि माझे हे मला परत चिडवत बसलेत.... |
असो अशी आहे आमची कहाणी आवडली का तुम्हाला please कळवा. |
तुमचीच सखी, |
"माझे पान" |