मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Saturday, 20 January 2018

आजी झाली टेक्नोसॅव्ही


विज्ञानाच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत आहेत. नवनीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. यामुळे आपली प्रगतीच आहे. आजची पिढी तर आहे पण आपले आजी ,आजोबा किंवा आई वडील असो आपल्यापेक्षा ते अधिक  टेक्नोसॅव्ही आहे.
हेच, बघा ना माझे वडील ऑफिसच्या काम निमित्त लवकर टेक्नोसॅव्ही झाले. पण आईचे तसे  नव्हते झाले. आमच्या भोवतालीच संपूर्ण दिवस जात होता. स्वतःसाठी वेळ कधी देता आलंच नाही.
मग आम्ही सगळ्यांनी मिळून तिला मोबाईल गिफ्ट दिला 😍. आणि  ठरवले तिला पण आपल्या सारखे टेक्नोसॅव्ही करायचे . आधी आम्हाला थोडे अवघड झाले. पण आता गाडी सुसाट धावते 😍 . 
 सकाळी उठल्या पासून मॅसेज, काही फोटो, काही सुंदर विचार , असं सगळं पाठवत असते आणि  ते सगळं वाचण्याचा अट्टाहास असतो 😂. आणि ऑन लाइन खरेदी पण 😂, आता तर घरात लहान नातू आहे. त्याचे फोटो काढणे , व्हिडीओ तयार करणे आणि मैत्रिणींना ग्रुप वर पाठवणे, आणि आम्हाला हसत म्हणते 😂, बघा  नातवाच्या फोटोला फेसबुक वर किती लाइक आणि कंमेंट आल्या😜, आणि बरका त्या सगळ्या माझ्या मैत्रिणींनीच आहेत 😜.
 व्हाट्स अप वर इतके वेगवेगळे ग्रुप असतात. आणि संपूर्ण महिन्याचे कार्यक्रम ठरलेले असतात. पण व्हॉटस अप आणि फेसबुक यांनी जुन्या मैत्रिणींना एकत्र आणले आणि नव्याने काही मैत्रिणीशी ओळख झाली. यामुळे हितचिंतकांनी आशीर्वाद, शुभेच्छा देणे हे साध्य झाले. आणि स्वतःसाठी वेळ देणे शक्य झाले.  हे बघून आम्हाला खूप समाधान मिळते 😵😵.
यातून एक गोष्ट अशी लक्षात येते कि, नव्या तंत्रज्ञानामुळेच जग अधिक जवळ आले 
हे खरे आहे.  टेक्नोसॅव्ही जगात आपणही तंत्रात मागे न राहता त्याचा उपयोग करावा, या हेतूने तर नवनवीन उपकरणांची माहिती ते घेत आहेत. त्यांना आता नवे ते हवे आहे 😊

सीमा लिंगायत  कुलकर्णी
पुणे