मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Saturday 27 January 2018

व्हॉटस् अॅप !



या वरच्या दोन फोटो मध्ये खूप साम्य आहे. फक्त काळानुरूप हातातल्या गोष्टी बदल्या आहेत. पण उजव्या  बाजूच्या फोटोला चूल मुल आणि व्हॉटस् अॅप असे नाव देण्यात आले . आणि तो फोटो खूप व्हायरल झाला. आणि त्यावरून जोक, चर्चा पण खूप झाल्या. गंमतीचा भाग सोडला समाजमाध्यमांच्या गैरवापरावरून नेहमी टीका होते, मात्र त्याचा सुयोग्य वापर केल्याने घडून आलेल्या सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे.
प्रत्येक स्त्री हि सकाळी लवकर उठते. मुलांचा ,नवऱ्याचा डब्बा , घरातली बाहेरची कामे, पाहुणे मंडळींचे स्वागत, हे सगळं वेवस्थित पार पाडत असते. . त्यातून वेळ मिळाला कि व्हॉटस् अॅप बघते. पण या व्हॉटस् अॅप वर काही जोक , चांगले विचार, मित्र मैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या सुख दुःखात सहभागी, वेगवेगळ्या रेसिपीज , मुलांच्या शाळेचे मॅसेज, क्लास चे अपडेट हे सगळं तर आमच्या मोबाईल वरच येत असतात. त्यातून आमच्या कार्यक्रमाचे प्लॅनींग हे सगळं या व्हॉटस् अॅप मुळे सहज आणि सोपे झाले आहे. 
हेच बघा ना! एकदा काय शाळा सोडली की विखुरलेले मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटणे अशक्य होत असे, पण  हे एकेकाळचं चित्र आता बदलतंय. फेसबुक, व्हॉट्सअॅपमुळे जुन्या मित्र-मैत्रिणींना शोधून त्यांच्याशी पुन्हा जोडलं जाणं सोपं झालंय.  व्हॉट्सअॅप ग्रुप्स होतात, पुढे शाळेच्या आठवणीने ‘गेट टुगेदर्स’ही केली जातात. त्यानिमित्ताने शाळेत जाणं आणि शाळेच्या दिवसांतल्या आठवणींना उजाळा देणं ही कधी कल्पनेतही नसलेली किमया याच ‘सोशल मीडिया’मुळे शक्य झालं आहे.
पण मैत्रिणींनो यात थोडी रिस्क पण आहे ती सांभाळून करूया एन्जॉय चूल मुलं आणि काय झालं ! अहो म्हणजे व्हॉटस् अॅप ! 😰😰

सीमा लिंगायत  कुलकर्णी
पुणे



No comments: