महाराष्ट्र हि एक संतांची भूमी
म्हणून ओळखली जाते. त्यात काही स्त्री संत देखील होऊन गेले आहेत.
||संत जनाबाई ||
संत नामदेवांच्या सहवासात राहून
विठ्ठल भक्तीचा ध्यास घेतला होता. म्हणून त्यांची ओळख संत कवयित्री जनाबाई अशी
होती. विठू माझा संत जनाबाई यांचा प्रसिद्ध अभंग. महाराष्ट्राच्या
खेड्यापाड्यातून अजूनही स्त्रिया जात्यावर
दळण दळताना, कांडताना संत जनाबाईच्या ओव्या
गातात.
लेकुरवाळा,
संगे गोपाळांचा मेळा।।’
स्त्रीजाणीव करून देणारा त्यांचाडोईचा पदर आला खांद्यावरी। भरल्या
बाजारी जाईन मी हा अभंग
संत जनाबाईंच्या नावावर एकूण सुमारे
३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत.
||संत सोयराबाई||
अभंगामधून जगण्याचे वास्तव रोखठोक
पणे सांगणे हि संत सोयराबाईंची ओळख होती. सोयराबाई यांना संजकडून खूप त्रास सहन
कराव लागला होता .
अवघे दु:खाचे सांगाती दु:ख होता
पळती आपोआप
आर्या पुत्र भगिनी माता आणि पिता हे
अवघे सर्वथा सुखाचेचि
आता आता कुठे विटाळ (पाळी ) कडे
बघ्यांच्या लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे पण . पण सातशे वर्षांपूर्वी देखील
याबद्दलचे त्यांचे विचार हे या अभंगातून
दिसून येतात ..त्यांनी असा थेट प्रश्न केला होता कि देहात विटाळ वसतो मग देह कोणी
निर्माण केला?
‘’देहासी विटाळ म्हणती सकळ
आत्मा तो निर्मळ शुदध बुद्ध
देहीचा विटाळ देहीच जन्मला
सोवळा तो झाला कवण धर्म’’
त्यांच्या जास्तीत जास्त परखड ,
वास्तवदर्शी , दुःखद असे अभंग आहेत .सोयराबाईंचा रंगी रंगला श्रीरंग।
अवघा रंग एक झाला हा प्रसिद्ध अभंग आजही तेवढ्याच आवडीने ऐकला जातो.
।। श्री संत वेणाबाई ।।
बहू कष्टलो पातलो जी स्वदेशा !
प्रजा बोलती कौल दे राघवेशा !!
मध्ययुगीन काळात विधवा स्त्रीने
कीर्तन करणे हि एक क्रांतीच असायची पण वयाच्या १० व्य वर्षी विधवा झालेल्या संत
वेणाबाईंनी समर्थ रामदासांचे शिष्यत्व स्वीकारून त्या कीर्तन करू लागल्या. स्त्री-शिष्यांपैकी फक्त वेणाबाईंनाच उभे
राहून कीर्तन करण्याचा अधिकार मिळाला होता.
वेणाबाईंच्या शैली हि वेगळीच आणि
उठावदार होती. त्या स्वतः गीतरचना,
अभंग रचना करतच, आणि त्यासोबत गट देखील
असत. ‘दासविश्रामधाम’
या ग्रंथाचे कर्ते आत्मारामबुवा वेणाबाईंचे वर्णन फार छान करतात.
‘धन्य वेणाई वेणुमोहित।
वेणुविण गाय सप्रेमयुक्त।।
वेणुधर हरि होय तटस्थ
वेणांकधरवाणी मोहळे।।’
||संत महदंबा||
महानुभाव
पंथातील एक व्यक्ती आद्य कवयित्री महादंबा किंवा महदाइसा . त्यांच्या जन्म
मराठवाड्यातील जालना येथे झालेला आहे. महदाइसा ही चक्रधरस्वामींची शिष्या होत्या.
महदाइसेचे ’लीळाचरित्र’, ’श्री प्रभुचरित्र’, ’स्मृतिस्थळ’ व ’धवळे’हे चार ग्रंंथ प्रसिद्ध आहेत. महानुभाव पंथातील महदंबाकृत धवळे हे एक रसाळ
काव्य आहे. या काव्यामुळे महदंबेकडे आद्यकवयित्रीचा मान आहे.
एक
रसाळ रचना
‘ऐसें मान आइकौनि मानवले जगन्नाथु :
दारुकाकरवीं
आणविला रथु :
अरूढले
कृष्णनाथरावो सरिसा विप्र जो आनंदें निर्मरु :
कव्हणा
नेणतां देवो चाले कौंडण्यपुरा वेगवतरु :’
||संत मुक्ताबाई
||
मराठी
साहित्याचे दालन ज्यांच्या मुळे संपन्न झाले आहे अशा ज्ञानदेवांच्या भेनी म्हणजे
मुक्त बाई . मुक्ताबाई यांनी ४१ अभंग लिहली आहेत . मुक्ताबाईंचा असा विश्वास होता
की संत म्हणजे इतरांवरील टीका स्वीकारणे म्हणून त्या म्हणाल्या , “संत जेणे वहावे,जग बोलण सोसावे “मुक्ताबाई यांना मुक्ताई या
नावानेही ओळखल्या जाते.
||श्री संत
कान्होपात्रा||
या १५ व्या शतकातल्या
मराठी कवयित्री . आजही मनाचे स्थान आणि विठ्ठल भक्तीचा अभंगरचना लाभलेल्या कवियत्री म्हणून त्यांची ओळख आहे.
कान्होपात्रा या दिसायला खूप सुंदर ,देखण्या
होत्या त्यामुळे त्यांना बिदरच्या
बादशहाने पकडून जाण्यास सांगितले तेव्हा त्याच्या मदतीला कोणी धावून आले नाही आपले
शील भ्रष्ट होऊ नये म्हणून त्या पंढरपूर्ला गेल्या पांडूरंगाच्या पायास कडकडून मिठी मारली व
आर्तवाणीने पांडुरंगाचा धावा केला आणि तिथेच आप्ले प्राण सोडले.
नको देव राया अंत असा पाहू । प्राण
हा सर्वता जावू पाहे ॥
हरीणीचे पाडस । व्याघ्रे धरीयले ।
मजलागी झाले तैसे देवा ॥
मोकलून आस । जाहले उदास । घेई
कान्होपात्रेस ह्र्द्यात ॥
कान्होपात्रा यांचे ३३ अभंग ’सकल संत गाथा’ या ग्रंथात समाविष्ट झाले आहेत.
|| संत
बहिणाबाई ||
'जुन्यात चमकेलं आणि नव्यात
झळकेलं असे बावनकशी'अशा प्रकारे सोन्यासारखे त्यांचे
काव्य आहे. असा अभिप्राय त्यांना आचार्य अत्रे यांनी बहिणाबाई याना दिलेला आहे.
अरे खोप्यामधी खोपा,
अरे संसार संसार, धरित्रिच्या कुशिमधे,
बिना कंपाशीनं उले,मन वढाळ वढाळ, माझी माय सरसोती,
बहिणाबाईंच्या कवितांचा विशेष विषय
म्हणजे मनुष्याचा जन्म ,जीवन, मृत्यू यावर आधारित असायचा . त्यांच्या काही काव्यातून मनुष्य आपले पोट भरण्यासाठी
कसा प्रयत्न करत असतो. किती कठीण गोष्टींना तोंड द्यावे लागते.
म्हणजे पूर्वीच्या काळी देखील मुक्ताबाई,
जनाबाई, बहिणाबाई, सोयराबाई,
निर्मळा, भागु आणि कान्होपात्र यासारख्या अनेक
स्त्री संतांनीच आपल्या भारूड, भक्ती, कीर्तन,
ओव्या , अभंग यातून एकोपा कसा वाढवावा ,
अन्यायाविरुद्ध कसे लढावे, धर्मभाव विसरून
एकत्र कसे राहावे हे शिकवले आणि यातूनच भावसंपन्न मराठी कविता समृद्ध झाली .
पुणे
No comments:
Post a Comment