
आमचा खास स्पेशल व्यक्तीसाठी व्हॅलेंटाईन डे न राहता संपूर्ण फॅमिली👨👨👧👦 सोबत व्हॅलेंटाईन डे वीक सेलिब्रेशन ची परंपरा हि २०१० पासून चालू झाली ती अजून हि चालू आहे. म्हणजे आमच्या घरात व्हॅलेंटाईन डे ची सुरवात हि शेंडेफळ 👶 पासून सुरु होते. आणि व्हॅलेंटाईन डे चा शेवट हा त्याच्या आजोबांच्या 👴 वाढदिवशी होत असतो. मग त्याचे आजोबा हळूच आजीकडे बघून म्हणतात 'अभी तो मै जवान हू 💑 ' आणि आजी हळुच लाजते 😊.
व्हॅलेंटाईन डे फक्त प्रियकर-प्रेयसी किंवा पती-पत्नीत साजरा करणे असा नाही . तर याचा अर्थ व्यापक आहे. एक मुलगा आपल्या 70 वर्षे वयाच्या आजीलाही लाल गुलाब 🌹 देऊन, फॅमिली👨👨👧👦 सोबत आपला व्हॅलेंटाईन बनवू शकतो. व्हॅलेंटाईन म्हणजे ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो अशी व्यक्ती. आपण डोळे बंद केल्यावरदेखील त्याचेच अस्तित्व आपल्या डोळ्यांसमोर तरंगत राहते. ज्याप्रमाणे मीरेने कोणत्याही स्वार्थाशिवाय कृष्णावर प्रेम केले त्याप्रमाणे. मित्रदेखील आपला व्हॅलेंटाईन होऊ शकतो. व्हॅलेंटाईनचा खरा अर्थ आहे कोणत्याही स्वार्थाशिवाय प्रेम.
चला तर मग माझ्या सगळ्या मित्र, मैत्रिणींना, नातेवाईकांना 💝हॅपी व्हॅलेंटाईन डे💝.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सीमा लिंगायत कुलकर्णी
पुणे