मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Saturday, 27 January 2018

Thanks to whatsapp

सर्वात आधी मला असं मांडावस वाटतंय कि आपण बायकांनीना guilty फीलिंग सोडून द्यायला पाहिजे कारण आधीच बायकांविषीयी बोलायला प्रत्येकजन अगदी उस्तुकनेते (टोमणे मारायला ) तयार असतात  त्यातही असे विषय दिले तर आपणच आपल्याला कमी लेखायला कमी करत  नाही म्हणूनच मी आधी सांगते आपण काही जगावेगळे वागत नाही आहोत उलट जर आपण फक्त चूल आणि मूल करत बसलो तर आपल्यातील mulitasking skill अगदी वाया जाईल बरं का.  😄अगदी देवाने सुद्धा मान्य केलेले आहे आपण स्त्रिया सर्वगुणसंपन्न असतात आणि आपण बराच गोष्टी at a time handle करू शकतो  मग ते स्वयंपाक करणे , मुलांना संभाळणे , त्यांचा अभ्यास करवून घेणे , नातेवाईकांना आणि फ्रेंड्स  जपणे अगदी सहजपणे करू शकतो. 😄 Thanks to whatsapp कारण  जो पर्यंत whatsapp नव्हत तो पर्यंत जीवन अगदी रेंगाडल्यासारखं वाटत होत आता कसं जीवन हलकं फुलकं मनोरंजक झालंय, एक आहे कोणतीही गोष्टीचा अतिरेक झाला नाही तर त्यातून आनंदच होतो पण "अति तेथे माती " लक्ष्यात असू द्या मैत्रिणींनो.  & Enjoy the Era of "चूल ,मूल आणि व्हाट्सअँप "🚩🤗👰

व्हॉटस् अॅप !



या वरच्या दोन फोटो मध्ये खूप साम्य आहे. फक्त काळानुरूप हातातल्या गोष्टी बदल्या आहेत. पण उजव्या  बाजूच्या फोटोला चूल मुल आणि व्हॉटस् अॅप असे नाव देण्यात आले . आणि तो फोटो खूप व्हायरल झाला. आणि त्यावरून जोक, चर्चा पण खूप झाल्या. गंमतीचा भाग सोडला समाजमाध्यमांच्या गैरवापरावरून नेहमी टीका होते, मात्र त्याचा सुयोग्य वापर केल्याने घडून आलेल्या सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे.
प्रत्येक स्त्री हि सकाळी लवकर उठते. मुलांचा ,नवऱ्याचा डब्बा , घरातली बाहेरची कामे, पाहुणे मंडळींचे स्वागत, हे सगळं वेवस्थित पार पाडत असते. . त्यातून वेळ मिळाला कि व्हॉटस् अॅप बघते. पण या व्हॉटस् अॅप वर काही जोक , चांगले विचार, मित्र मैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या सुख दुःखात सहभागी, वेगवेगळ्या रेसिपीज , मुलांच्या शाळेचे मॅसेज, क्लास चे अपडेट हे सगळं तर आमच्या मोबाईल वरच येत असतात. त्यातून आमच्या कार्यक्रमाचे प्लॅनींग हे सगळं या व्हॉटस् अॅप मुळे सहज आणि सोपे झाले आहे. 
हेच बघा ना! एकदा काय शाळा सोडली की विखुरलेले मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटणे अशक्य होत असे, पण  हे एकेकाळचं चित्र आता बदलतंय. फेसबुक, व्हॉट्सअॅपमुळे जुन्या मित्र-मैत्रिणींना शोधून त्यांच्याशी पुन्हा जोडलं जाणं सोपं झालंय.  व्हॉट्सअॅप ग्रुप्स होतात, पुढे शाळेच्या आठवणीने ‘गेट टुगेदर्स’ही केली जातात. त्यानिमित्ताने शाळेत जाणं आणि शाळेच्या दिवसांतल्या आठवणींना उजाळा देणं ही कधी कल्पनेतही नसलेली किमया याच ‘सोशल मीडिया’मुळे शक्य झालं आहे.
पण मैत्रिणींनो यात थोडी रिस्क पण आहे ती सांभाळून करूया एन्जॉय चूल मुलं आणि काय झालं ! अहो म्हणजे व्हॉटस् अॅप ! 😰😰

सीमा लिंगायत  कुलकर्णी
पुणे