औरंगाबादच्या कचरा कोंडीची बातमी पाहून माझ्या मनात विचार आला, फक्त औरंगाबादच नाही तर बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न पुढे मागे निर्माण होऊ शकतो. याला कळत नकळत आपण सारेच जबाबदार आहोत का? तर याचे उत्तर नक्कीच हो येईल बरोबर ना. आपल्या सगळ्याना सुखी जीवन हवे असेल तर चला कचरा वर्गीकरण करून, एक पाऊल स्वच्छतेकडे टाकू आणि स्वच्छ औरंगाबाद करूयात.
आपण सगळे कमीतकमी कष्ट करून जास्तीत जास्त सुखात राहायचा प्रयत्न करतोय. वापरा आणि फेका ही प्रवृत्ती आपल्या सगळ्यामध्ये निर्माण होत चालली आहे. त्याकडे किमान आता तरी गंभीर प्रश्न म्हणून पाहिले पाहिजे.
युज अँड थ्रो- प्लास्टिक कचरा

बिस्लरी बाटल्या

नॅपकिन्स

पॉलिथीन पिशव्या

स्वतंत्र पिशवीचा हट्ट

वापरा आणि फेका वृत्ती

वस्तू दुरुस्तीकडे आपला कल नसतो. बूट, चप्पल, खेळणी, छत्री अशा गोष्टी आपण लगेच फेकून नव्या घेतो. त्या वस्तूचा दुरुस्त करून पुन्हा वापर करणे ही संकल्पना आपल्याला रुचत नाही त्यामुळे अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील. याला जबाबदार कोण? याचे उत्तर म्हणजे सध्याचे धावते युग म्हणावे लागेल. कोणालाही विचार करायला वेळ नाही. रात्र थोडी सोंगे फार. प्रत्येक जण आपापल्या कोशात आणि व्यापात इतका अडकलाय की त्याला स्वतःच्या आयुष्याची कोंडी फोडायला वेळ नाही तर कचरा कोंडीचं काय घेऊन बसलात ?
पार्सल

इलेक्ट्रॉनिक वस्तू

मित्र मैत्रिणीनो आता कचरा गोळा करताना त्याचे वर्गीकरण करा. म्हणजे ओला सुका आणि इतर वस्तू आदींचे. यामुळे आपले आणि आपल्या आप्तस्वकीयांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत मिळेल.
प्रतीक्षा परिचारक-पाठक
औरंगाबाद