मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Saturday, 13 January 2018

हॅलो फ्रेंड्स

मी सुरुवात करत आहे "माझे पान" या नावाने , तसे बघायला गेले तर आपल्या मनात भरपूर काही दडलेले असते. कसे बोलावे , कधी बोलावे या विचारताच आपले विचार हरवून जातात.मला माझ्या एका मैत्रिणीने या ब्लॉग बद्दल सांगितले, मग विचार केला यावरच आपले विचार व्यक्त करावे.तसे बघायला गेले तर दिवस असे पटापट जातात कि काही समजायच्या आताच आपली मुले लगेच मोठी होऊन जातात आणि मधेच केव्हातरी जुने फोटोज बघता बघता लक्षात येतात बऱ्याच मस्ती मजा आणि खोडी आपल्या पिटुकल्यांच्या .माझा मुलगा लहान असल्यापासून फारच मस्तीखोर, तासा आता बराच शांत आणि समजदार झाला आहे. मला आठवणीत राहिलेले दोन प्रसंग मी येथे वर्णन करत आहे१. ३ वर्षांचा असतांना एकदाना खाली खेळतांना  ३ पायऱ्या वरून उडी मारून पडला आणि जे रक्ताने भरला ना, मी नेमकी घरी होते म्हणून बर झालं.२. दोन वर्षा आधी बेट्याने हात सुध्दा फॅक्चर करून घेतलेला तेंव्हासुध्दा मीच आपली रडत होते त्याने अगदी समजदार मुलासारखे सगळे सहन केले.असो असे आमचे चिरंजीव उद्योग करत ह्या आठवणी आल्या कि आपोआप डोळे पाणावतात. पण आता बरेच मोठे झाले कि तेच कौतुकाने आपले पराक्रम आपणच सगळ्यांना सांगतात आणि हसवतात.खरं आहे "वेळच माणसाला शिकवते, सावरते आणि पुढे चालायला सांगते".