"जन्मताच मुली असुरक्षित" विषयचा विचार येताच मनात वेगवेगळे विचार येऊ लागतात , खरंआहोत का आपण हि सुरक्षित ? |
नेमका थोड्या दिवसाआधी " पद्मावत " बघितला तेव्हा विचारांचे काहूर पेटले डोक्यात, खरंच आहोत का आपणही सुरक्षित ? |
किती वेळ लागतो आपल्याला नेगेटिव्ह विचार करायला अगदी क्षणभर हि नाही लगेच वारे वाहू लागतात नेगेटिव्हिटीचे , त्यामुळे मनावर ताबा ठेवून थोडे प्रॅक्टिकली विचार करून जेव्हा विचार करू तेव्हा आपण आपल्या समस्या सोडवू शकू . |
नेमके काय आहे "स्री "ना आपण मुळातच खूप हळवी असते त्यामुळे तिला तिच्या भावना लगेच मांडता येत नाहीत मात्र तिच्या डोळ्यातून तिला काय वाटले हे लगेच कळते . पुरुषप्रधान संस्कृतीत आपण राहत आहोत , कितीही स्त्री वर्ग पुढे आला असला तरी समाजात वावरतांना आपण आपल्या मर्यादा सांभाळूनच राहावे .आपल्या घरापासूनच सुरुवात करावी मुलामुलींना सारखीच वागणूक द्यावी |
मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे . दोघांचेही अगदी वेगवेगळे स्वभाव , सवयी आहेत. |
आम्ही दोघांनाही सारखेच लाड करतो ,पण मुलीची जरा जास्तच काळजी घेतो हे मलाही वाटते . खरंच एवढे बिनधास्त मी तरी माझ्या मुलीला सोडेल असे मला वाटत नाही , नक्कीच अजून लहान आहेत दोघेही पण वेळ आल्यावर दोघानाही समजवून सांगणे गरजेचे आहे . कितीही मोर्डेन विचार आपण ठेवले तरी आपली "मुले " हि आपली जबाबदारी आहेत, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे हे आपले कर्त्यव्य आहे आणि जगाची ओळख त्यांना आपल्या विचारातून होत असते , त्यामुळे आपण पॉसिटीव्ह च बोलले पाहिजे आतापासून त्यांना भ्रमिष्ट न करता ,त्यांना काय योग्य काय अयोग्य याचे शिक्षण द्यायलाच हवे. |
मुलापेक्षा मुली ह्या खूप जिवाच्या आत असतात हे मात्र नक्की , त्यामुळे त्याची काळजी करणे , सुरक्षितता पाहणे हेही साहजिकच. |
तुमचीच सखी |
माझे पान |
मोकळा श्वास .......!
Saturday, 17 February 2018
पॉसिटीव्ह च बोलले पाहिजे
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Khary aajkal chya pidhi shi positive boln khup aavshyk aahe.
Post a Comment