मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Sunday, 14 January 2018

परदेशी बाई समोर मराठी बोल.....!

माझा मुलगा ऋतुज लहान असताना खूप अवखळ होता . 
एका ठिकाणी कधीच रहात नसे. तो तीन वर्षांचा असताना आम्ही एकदा हॉटेल मध्ये गेलो होतो.
तो अजिबात कुणालाही घाबरायचा नाही.आम्ही जिथे बसायचो तिथून तो उठून जाइ, आणि कोणत्याही टेबल वर जाऊन बसे.लहान असल्याने सगळ्या टेबल वर त्याचे स्वागतच होई.
एकदा एका परदेशी बाई समोर तो बसला,आणि तिच्याशी मराठीत बोलू लागला.


मृण्मयी भजक मुंबई