परवा जुन्या फाईल मध्ये आपलं पहिलं पत्र 📝 सापडलं,,....पहिल्या व्हॅलेंटाईनच💞 आणि जुन्या आठवणींनी ओठावर हसू 😊आलं,.....कारण माझ्या वेडूने त्याच वर्तमानपत्र📰 केलं होतं आधी ते हाती लागलं सासऱ्यांच्या, ....मग काय नुसती मजा पत्रातले फुगे 🎈छान हलके उडत होते आणि आमचे फुगे फुटले होते.........
महिनाभरा पूर्वी उमलले प्रेम💗 आता घाबरत होतं😱,......पण त्या पत्राने वेगळीच जादू झाली माझं पत्र सासू सासऱ्यांनाच इतकं आवडलं की ते म्हणाले,"जिने समभाळलंय पत्रातील काव्य एवढं छान,.....तीला नक्कीच राहील संसाराचं भान,....🤗."मग काय पुढच्या व्हॅलेंटाइनला मी माझ्या राजाची राणी होते
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
स्वप्ना मुळे(मायी)
औरंगाबाद
1 comment:
Kami shabdat sundar lekhn..
Post a Comment